माझा जीवनासंबंधी विचार हा आहे.
हे एक जीवन पदरी पडले आहे. हे ते जीवन आहे. त्यास चांगले जगा.
हा एक दिवस पदरी पडला आहे. हा तो दिवस आहे. त्यास चांगला जगा.
हा एक क्षण पदरी पडला आहे. हा तो क्षण आहे. त्यास चांगला जगा.
क्षण चांगले जगल्या ने, तास चांगला ज़गला जातो.
तास चांगला जगल्या ने, दिवस चांगला ज़गला जातो.
दिवस चांगला ज़गल्या ने, आठवडा चांगला ज़गला जातो.
आठवडा चांगला ज़गल्या ने, महिना चांगला ज़गला जातो.
महिना चांगला ज़गल्या ने, वर्ष चांगले ज़गले जाते.
वर्ष चांगले जगल्या ने, आयुष्य चांगले ज़गले जाते.
तर आयुष्य चांगले जगायची इच्छा असेल, तर प्रत्येक क्षण जवाबदारी ने लक्षपूर्वक जगणे आवश्यक आहे.
एखाद्या लिंबाचा रस काढायचा असेल तर मी आधी त्याला व्यवस्थित पिळतो. नंतर मी त्यात काही पाण्याचे थेंब दोन तीनदा घालून पुन्हा पुन्हा पिळतो. असे केल्याने त्यातला सर्व रस काढून घेतो. ह्याच तर्हेने मी माझे जीवन जगतो. प्रत्येक क्षणाचा उपयुक्त वापर स्वत:साठी असो अथवा दुसर्या साठी असो, वापरून क्षणोक्षणी समाधान निर्मिती करतो.
हे लिहीताना मी तेच केले आहे.
No comments:
Post a Comment